Maharashtra Governmnet: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Government Big Decision: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची जेवढी जमीन, त्याला तेवढच खत मिळणार या सूत्रानुसार आता खतांचे वाटप केले जाणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील खत विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि साठेबाजीला चाप लावण्यासाठी कृषी विभागानं आता 'खत रेशनिंग'चा मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची जेवढी जमीन, त्याला तेवढच खत मिळणार या सूत्रानुसार आता खतांचे वाटप केले जाणार आहे.

खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी विभागानं राज्यभरात ६ हजार दुकानांची तपासणी केली. त्यातील ४०० परवाने रद्द केलेत. लिंकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी ही कडक पावलं उचलली जात आहेत. बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचंही कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com