Sambhajinagar News : जाहिरात छापली, मैदानी चाचणीही झाली, पण एक चूक अन् बोगस कमांडो भरतीचा पर्दाफाश | Video

Fake Commando Force : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये जवान बनवण्याचे आमिष दाखवून ९३ तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये जवान बनवण्याचे आमिष दाखवून चक्क बोगस भरती केल्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलंय. या भरतीसाठी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयाच्या जवळच असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पोलिस भरतीप्रमाणे मैदानी चाचणीदेखील घेण्यात आली. मात्र, पात्र उमेदवारांना नियुक्ती शुल्क मागताच टोळीचा भांडाफोड झाला. विशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनी लाला बागाव अशी तिघा भरती प्रक्रिया राबविणाऱ्या भामट्याची नावे आहेत. हे तिघेही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील रहिवाशी आहेत. या प्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोशल मीडियावर महाराष्ट्र कमांडो फोर्स भरतीची बनावट जाहिरात देऊन सुमारे ९३ तरुणांकडून प्रत्येकी ६ हजार रुपयेप्रमाणे तब्बल ५ लाख ५८ हजार रुपये उकळल्याच तपासात समोर आले. ऑफलाइन भरती प्रक्रिया असल्याचे सांगून लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिघांनी बेरोजगार उमेदवारांची भरती प्रक्रियादेखील राबवली. पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावस असलेल्या मराठवाडा सांस्कृतीक क्रीडा मंडळाच्या मैदानावर आरोपींनी भरतीची प्रक्रिया राबविली. भरतीसाठी त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नव्हती. आर्मीचा ड्रेस परिधान करून एवढ्या प्रमाणात बोगस भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com