Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics News : विधानसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. भाजपकडून बटेंगे तो कटेंगे, असा नारा दिला जात आहे. भाजपच्या नाऱ्याला काँग्रेसकडून उत्तर दिलं जात आहे.

भरत मोहळकर, साम टीव्ही

मुंबई : उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीरनंतर भाजपने आता महाराष्ट्राच्या निवडणूकीत धार्मिक धृवीकरणासाठी बटेंगे ते कटेंगे या घोषणेवर भर देण्यास सुरुवात केलीय.. तर बटेंगे तो कटेंगे या उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवांनी दिलेल्या जुडेंगे तो जितेंगे घोषणेचा आधार काँग्रेसने घेत भाजपवर पलटवार केलाय.

लोकसभा निवडणुकीत बहुसंख्यांकांच्या मतांचं विभाजन झालं. मात्र अल्पसंख्याकांनी एकगठ्ठा मतदान केल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतांचं विभाजन झाल्यास पराभव अटळ असल्याचं स्पष्ट झाल्याने भाजने बटेंगे तो कटेंगे आणि त्यानंतर मोदींनी 'एक है तो सेफ है'चा नारा दिलाय. तर महाराष्ट्रात जातीयवाद वाढवण्यासाठीच भाजपनं आदित्यनाथ यांना आणल्याचा आरोप पवारांनी केलाय.

आरक्षणामुळे महाराष्ट्रात जातीय अस्मिता टोकाला गेल्या आहेत. आणि याचाच फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळेच जातीजातीत विभागले गेलेले मतदार हिंदू म्हणून एकत्र आणण्यासाठी भाजपनं बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है चा नारा दिलाय. कारण जाती-जातींमध्ये संघर्ष तीव्र झाला तर भाजपचं विजयाचं समीकरणं कोलमडतं....आणि हिंदू म्हणून सर्व जाती एकवटल्या तर भाजपचं समीकरण जुळतं....मात्र हा उत्तरेतल्या गाय पट्ट्यातला नारा महाराष्ट्रात चालणार का ? याबाबत उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com