Liquor Home Delivery News : आता घरबसल्या मिळणार दारू, डिलिव्हरी कंपन्यांनी केली तयारी

आतापर्यंत वस्तू आणि गरमागरम जेवण ऑनलाईन ऑर्डर केल्यावर मिळत होतं. आता दारूचीही होम डिलिव्हरी होणार आहे.

दारु घेण्यासाठी ग्राहकांना आता बार आणि वाईन शॉप्समध्ये गर्दी करावी लागणार नाही. कारण मद्यप्रेमींना आता घरबसल्या दारुची डिलिव्हरी होणार आहे. स्विगी, झोमॅटो आणि बिग बास्केट सारख्या कंपन्यांनी यासाठी तयारीही केली आहे. प्रायोगिक तत्वावर आधी राजधानी दिल्लीत हा उपक्रम सुरू होणार आहे. पण इतर राज्यातही ही व्यवस्था सुरू होणार आहे. या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलही जास्त मिळणार आहे. कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब, हरयाणा, गोवा आणि केरळमध्ये ही व्यवस्था लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com