Video Laxman Hake: मुख्यमंत्र्यांचं मनोज जरांगे पाटलांना रेड कार्पेट- हाके

Laxman Hake On Reservation: ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगेंनी काढलेल्या शांतता रॅलीसंदर्भात देखील त्यांनी पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे.

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आरक्षणावरुन चांगलच तापलंय. एका बाजूला मनोज जरांगे विधानसभेच्या तयारीला लागलेत,तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. आज लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मनोज जरांगेंनी काढलेल्या शांतता रॅलीसंदर्भात भाष्य केलं. म्हणाले,मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला आमचा आक्षेप आहे. शांतता रॅलीला शाळा का बंद ठेवल्या? म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था सरकार पाळु शकत नाही का? असा थेट सवालच हाकेंनी विचारला. दरम्यान वडीगोद्री येथे केलेले उपोषण सोडताना सरकारने काही आश्वासने दिली होती. त्याची पुर्तता अद्याप केलेली नाही. असं देखील पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com