Lalbaugcha Raja : विसर्जन मिरवणुकीत लालबागच्या राजाचं मनमोहक रूप; पहा Video
अनंत चतुर्दशीनिमित्त आज सर्वत्र लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. घरगुती गणपतींबरोबरच मंडळाचे गणपती देखील विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. मुंबईतील लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक निघाली असून लाडक्या राजाचं शेवटच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. 10 दिवस लाखोंच्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. आज विसर्जन मिरवणुकीत देखील भक्तांनी राजाचं मनमोहक रूप बघण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसत आहे. आपल्या भक्तांच्या गर्दीतून वाट काढत राजा विसर्जनासाठी निघाला आहे. त्याच्यावर होणारी फुलांची, गुलालाची उधळण ही सर्व दृश्य अतिशय आकर्षक दिसत आहे.
आज मुबई, पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पाला भाविक साश्रूनयांनी निरोप देत आहेत. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज, मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईसह देशभरात प्रसिद्ध असलेला लालबागच्या राजाची देखील मंडपातून निघाली आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सगळे भाविक एकत्र जमले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.