Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना लवकरच मिळणार मे महिन्याचा हप्ता; आदिती तटकरेंनी दिली माहिती | VIDEO

Ladki Bahin Yojana May Month Installment: लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता महिलांना अजूनही मिळाला नाही. दरम्यान लवकरच लाडकींच्या खात्यात पैसे जमा होतील, असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान, लवकरच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा केला जाईल, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी म्हटलं आहे. जसा एप्रिल महिन्याचा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा होता. तसाच मे महिन्याचा हप्तादेखील महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, असं त्यांनी म्हटलं. विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवले जात आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता महिला मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, त्यानंतर जून महिन्याचा हप्तादेखील कधी जमा होणार, असा प्रश्न महिला विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com