भरत मोहळकर, साम टीव्ही
पांडू तात्या गेले.... पांडू तात्या गेले... म्हणत गल्लीत तात्यांचे आप्त शोक करत होते. जवळच्या सर्वांचेच डोळे पाण्यानं डबडबले होते..नातेवाईकांना पांडू तात्याच्या निधनाचा निरोप पाठवला.. कोल्हापुरातील कसबा बावड्याच्या उलवे वस्तीवर शोककळा पसरली... डॉक्टरांनी तात्यांची बॉडी घेऊन जाण्यास सांगितलं आणि तात्यांची बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली. ॲम्ब्युलन्स पांडू तात्यांची बॉडी घेऊन निघाली मात्र रस्त्यातील खड्ड्यामुळे अचानक अँम्ब्युलन्सनं ब्रेक मारला आणि त्याच झटक्याने पांडू तात्याच्या शरीराची हालचाल झाली... आणि अचानक तात्या गेले म्हणणारे तात्या जीवंत झाले हा निरोप सगळीकडे पाठवू लागले.. आणि क्षणातच दुःखाऐवजी सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू तरळले... आणि दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागतही झालं... तर ही पांडूरंगाची कृपा असल्याचं पांडुरंग उलवेंचा नातू म्हणालाय...
पांडुरंग उलवे हे वारकरी संप्रदायातील... सतत पांडुरंगाचं नामस्मरण करणारे... मात्र दहा दिवसांपुर्वी नेमकं काय घडलं ते स्वतः पांडुरंग उलवेंनीच सांगितलंय..
पांडुरंग उलवे यांच्या निधनाच्या बातमीने हळहळणारा प्रत्येकजण त्यांच्या जीवंत परत येण्याने सुखावलाय..त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी म्हणतात, हेच खरं..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.