Maharashtra Rain Update News | सांगलीत कोसळधार! अवकाळी पावसाने नागरीकांना दिलासा

Unseasonal rain News | अवकाळीने नागरीक सुखावले! रखरखत्या उन्हाळ्यात सांगलीत कोसळधार पाऊस..

महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाची रिप सुरू आहे, ऐन उन्हाळ्यात पावसामुळे सगळीकडे हाहाकार उडाला आहे.. सांगलीसह, हातकणंगले आणि जयसिंगपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सागंली शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. काही भागात गारा कोसळ्यात. सांगलीसह कोल्हापूर हातकणंकलेतही जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसात कोल्हापुरातही तापमाने 39 चा पारा ओलांडला होता. अवकाळी पावसामुळे नागरीकांना काही काळ उकाड्यापासून सुटका मिळाली. राज्यभरात उष्णतेची लाट पसरलीये. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही शहरात उष्णतेचा पारा प्रचंड वाढला होता. अशातच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या अवकाळी पावसामुळे काही काळ नागरीकांना दिलासा मिळालाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com