VIDEO : सेना प्रवेशांच्या चर्चांवर कॉंग्रेस नेते Jitesh Antapurkar स्पष्टच बोलले

Jitesh Antapurkar Congress News : सेना प्रवेशांच्या चर्चा आणि बातम्या अपप्रचार आहे असं म्हणत, कॉंग्रेस नेते जितेश अंतापूरकर यांनी, आगामी विधानसभा कॉंग्रेस मधूनच लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलुर विधानसभा मतदार संघाचे आमदार, जितेश अंतापूरकर यांच्यावर विधानपरिषद निवडणूक क्रॉस वोटिंगचा आरोप आहे.. तर  त्यानंतर भाजप नेते उपाध्याय , अशोक चव्हाण यांच्या भेटीमुळे अंतापूरकर चर्चेत आले होते.

आता अंतापूरकर यांनी राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.या भेटीनंतर अंतापुरकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर आमदार जितेश अंतापूरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांची भेट ही मतदार संघातील विविध विकास कामाविषयी घेतली होती. एक लोकप्रतिनिधी म्हणून विविध नेत्यांना भेटावे लागते. मी कॉंग्रेस पक्षातच आहे. तब्बेत खराब असल्यामुळे काँग्रेसच्या विभागीय बैठकीला गैरहजर होतो. तसं आमंच्या वरिष्ठांना मी कळवलं देखील आहे. कॉंग्रेसच्या काही लोकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रकार सुरू आहे. ते मला चुकीचं वाटतंय . माझ्या बद्दल कॉंग्रेस पक्षातले सुद्धा कुणी काही सांगितलं म्हणून अपप्रचार करणे याचा ही मला खेद वाटतोय.

काल मी मुंबई येथे कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली असून मी माझी भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुक मी कॉंग्रेस पक्षाकडूनच लढवणार असल्याचंही आमदार अंतापुरकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com