Jagannath Yatra : जगन्नाथ यात्रेदरम्यान डीजेच्या आवाजामुळे हत्तींचा धुमाकूळ, ३ ते ४ जण जखमी | VIDEO

DJ Noise Triggers Elephant Panic During Yatra : जगन्नाथ यात्रेत डीजेच्या आवाजामुळे हत्ती बिथरले गेले. या गोंधळात ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. त्यात एका मीडिया प्रतिनिधीचाही समावेश आहे.

जगन्नाथ यात्रेदरम्यान एक विचित्र घटना घडली असून, डीजेच्या प्रचंड आवाजामुळे हत्ती अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली.यात्रेच्या मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात डीजे सुरू असताना एक हत्ती अचानक घाबरला आणि इकडे-तिकडे धावू लागला. याच वेळी तीन हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्याने गर्दीमध्ये उपस्थित लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू केली.

या गोंधळात ३ ते ४ जण किरकोळ जखमी झाले असून, त्यात एका मीडिया प्रतिनिधीचाही समावेश आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर इजा झाली नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.घटनेमुळे काही काळासाठी यात्रेच्या मिरवणुकीत अराजकता पसरली होती, मात्र आता परिस्थिती स्थिर असून मिरवणूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com