INDIA VS ENGLAND CRICKET : भारतीय कसोटी क्रिकेटच्या ‘गिल’ पर्वाची सुरुवात आजपासून|VIDEO

All Eyes on Gill as India’s New Test Captain Faces England in Five-Match Series : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना आज पासून होणार आहे .प्रथमच कसोटी संघाची धुरा सांभाळताना शुभमन गिलला त्रिकुटाविना खेळावं लागणार आहे.

भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात आजपासून इंग्लंडच्या भूमीत होत आहे. अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत असून, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

भारतीय क्रिकेटच्या ‘गिल’ पर्वाची ही सुरुवात ठरणार आहे. प्रथमच कसोटी संघाची धुरा सांभाळताना शुभमन गिलला रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन या अनुभवी त्रिकुटाविना खेळावं लागणार आहे. त्यामुळे स्वत:मधील नेतृत्वगुण सिद्ध करतानाच सहकाऱ्यांकडूनही सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्याचं आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.

संघात नव्या युवाशक्तीचा समावेश करण्यात आला असून, त्यांना काही अनुभवी खेळाडूंचीही साथ लाभणार आहे.भारताचा हा युवा संघ इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आता या नव्या नेतृत्वावर आणि कसोटी संघाच्या नव्या युगावर केंद्रित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com