Devendra Fadnvis News | पुणे हिट अँड रन प्रकरणी आरोपीला अटक होणार? गृहमंत्री फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुण्यातील हिट अँड रन घटनेची गंभीर दखल घेतली आहे. फडणवीस यांनी पुणे पोलिसांशी चर्चा करून माध्यमांशी संवाद साधला आहे. अल्पवयीन तरुणाचा पोलिसांना ताबा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

पुण्यात एका अल्पवयीन तरुणाने बेदरकारपणे गाडी चालवली. आणि अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत या तरुणाला जामीनही मिळाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. फडणवीस यांनी पुणे पोलिसांशी चर्चा करून माध्यमांशी संवाद साधला आहे. अल्पवयीन तरुणाचा पोलिसांना ताबा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यांच्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे त्यांना सोडणार नाही असेही फडणवीस म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com