Pune Rain News | अवकाळी पावसामुळे पुण्यात कोसळलं होर्डिंग, प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी

पुण्यात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. वेधशाळेचा हा अंदाज खरा ठरलाय. पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे. पुण्यात सर्वत्र विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहतोय.

पुणे :

पुण्यात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. वेधशाळेचा हा अंदाज खरा ठरलाय. पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला आहे. पुण्यात सर्वत्र विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहतोय. या वादळी पावसामुळे वाघोली परिससात गाडीवर होर्डिंग कोसळले आहे. यात काही लोक जखमीही झाले आहेत. होर्डिंग कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालीये. हे होर्डिंग बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. पुणे नगर महामार्गावरील वाघोलीत गाडीवर होर्डिंग पडले आहे. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अवकाळी पावसातच होर्डिंग पडल्याने होर्डिंगबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com