Pune News : पुण्यातील रस्ते की नद्या; पावसाने दाणादाण
पुणे शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात मंगळवारी सकाळपासूनच पाऊस सुरुच होता. त्यामुळं सकाळपासूनच वातावरण ढगाळलेलं होतं. शहर अंधारुन आल्यासारखं झालं आहे. सकाळपासून सूर्याचं देखील दर्शन झालेलं नाही. पण गेल्या तासाभरापासून शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. त्यामुळं शहरातील विविध सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तसंच शहरात मेट्रोची कामं सुरु असल्यानं मोठ्या प्रमाणावर ट्राफिक देखील जाम झाल्याचं पहायला मिळालं. परतीच्या पावसानं पुण्यात अक्षरशः दाणादाण उडाली आहे. शहरातील मुख्य भाग असलेल्या पेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहनचालकांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. तर पुणे शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रोड या परिसरात सकाळपासूनच वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.