Video
Hamare Baarah Movie | बहुचर्चित 'हमारे बारह' या सिनेमाच्या कलाकारांना धमकीचे फोन
Hamare Baarah Movie News Today |मुस्लिम संघटनांकडून बहुचर्चित 'हमारे बारह' या सिनेमाच्या कलाकारांना धमकीचे फोन आल्याचा आरोप अभिनेते अनू कपूर यांनी केला आहे.
बहुचर्चित सिनेमा 'हमारे बारह' च्या कलाकारांना मुस्लिम संघटनांचे धमकीचे फोन आल्याचा आरोप अभिनेते अनू कपूर यांनी केला. दरम्यान या चित्रपटाच्या टीमने मुंबई पोलिसांत धाव घेतली आहे. अनू कपूर यांनी याबाबतचा आरोप करत गृहमंत्र्यालयाकडे सुरक्षेची मागणी केली आहे. नाशिकमध्ये सोमवारी या चित्रपटाला मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. येत्या ६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.