VIDEO: व्हिलन ते हिरो, हार्दिक ठरला रोहितचा हुकुमी एक्का, कारण काय?

Hardik Pandya News: T20 WC फायनलमध्ये हार्दिक पांड्याची दमदार कामगीरी, हार्दिक पांड्या ठरला रोहित शर्माचा हुकुमी एक्का.

डोळ्यातून निघालेले अश्रू.... रोहितला दिलेली झप्पी आणि रोहितनं दिलेली गोड पापी...हे कधीही न विसरता येण्यासारखं आहे....हा तोच पठ्ठ्या आहे.. ज्याला आयपीएलमध्ये अनेकांनी नावं ठेवली... याला टीममधून बाहेर काढा...याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन का बनवलं? असे अनेक सवाल उपस्थित करत.... त्याला व्हिलन ठरवलं.... पण तोच व्हिलन टीम इंडियाचा हुकमी एक्का ठरलाय आणि पुन्हा एकदा तो व्हिलनचा हिरो झालाय....

२०२४मध्ये टीम इंडियातील एका खेळाडूला सर्वात जास्त हेट करण्यात आलं तो म्हणजे हार्दिक पांड्या...हार्दिकनं गुजरात टायटन्सची साथ सोडली आणि मुंबई इंडियन्समध्ये कॅप्टन्सी मिळवली... मात्र... रोहितची जागा हार्दिकनं घेतल्यामुळे...चाहत्यांनी पांड्यावर मिमसह हेटर्सचा पाऊस पडला आणि पांड्याला रडू कोसळलं होतं...पण टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहितच्या नेतृत्वात पांड्याने ऐतिहासिक कामगिरी केली आणि संघाला विजयाच्या शिखरावर नेऊन ठेवलं... ते कसं शक्य झालं...? कारण रोहितच्या एका निर्णयानं हार्दिक गेमचेंजर ठरला...

१७७ धावांचं आव्हान दिलेल्या टीम इंडियानं...साऊथ आफ्रिका सावध झाली होती... आफ्रिकेचे दमदार बॅट्समन क्लासेन आणि मिलर या दोघांनी मिळून टीम इंडियाचा धुरळा पाडला होता. यावेळी आफ्रिका १४७ धावांच्या जवळपास होती...त्यानंतर रोहितनं १६ वी ओव्हर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या हातात दिली... यावेळी बुमराहने त्यांना फक्त चारच रन्स काढू दिले...त्यामुळे त्यांच्यवर हळूहूळ दबाव वाढू लागला.. त्यांनाही समुद्रासारखं शांत बसून चालणार नव्हतं... कारण ते विजयाच्या दिशेनं झेप घेऊ लागले होते.. आता ही जोडी कशी तोडायची? हा प्रश्न रोहितच्या मनात सतत घोळू लागला होता. पण यावर रोहितनं तोडगा काढला आणि आपल्या ऑलराऊंडर हुकमी एक्क्याला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला...

हा हुकमी एक्का म्हणजे हार्दिक... रोहितनं १७ व्या ओव्हरची जबाबदारी हार्दिककडं सोपावली...हार्दिकनं पहिला बॉल टाकला.. हा बॉल त्यानं क्लासनेच्या ऑफ साई़डला टाकला.. त्यामुळे बॉल थेट क्लासेनच्या बॅटच्या खालच्या बाजूला लागली आणि उंच उडाला.. त्यामुळे किपरींग करणाऱ्या ऋषभ पंतने ही कॅच झेलली आणि भारताला मोठी विकेट मिळाली... ही जोडगोळी तोडल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या... आता ऑफ्रिकेच्या खेळाडूंचे चेहरे बघण्यासारखे होते.. क्लासेननंतर मार्को यानसेन मैदानात उतरला... यावेळी हार्दिकनं दुसरा बॉल टाकला खरा... पण आफ्रिकेला एकही रन काढला आला नाही.. आता १७ व्या ओव्हर्सचे चार बॉल शिल्लक होते... पण या चारही बॉलवर आफ्रिकेनं सिंगल धावा काढल्या...

हार्दिकची ओव्हर संपल्यानंतर १८ वी ओव्हर बुमराहने टाकली आणि मॅचचा कायापालट झाला... कारण बुमराहने यानसनची विकेट पाडली होती... मात्र शेवटची ओव्हर हार्दिकनं पुन्हा एकदा टाकली आणि टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला.. संघ जिंकल्यानंतर हार्दिक भावूक झाला... त्याला अश्रू अनावर झाले.. त्याने टीममधल्या प्रत्येक खेळाडूला मिठी मारली आणि रोहितनं त्याला मिठी मारत गोड गोड पापी दिली... त्यामुळं रोहित आणि हार्दिकची जवळीक, मैत्री पाहता... हार्दिक आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं यशस्वी ठरला आणि टीम इंडियाचा हिरो बनला...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com