Video: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच
पुणे शहरात पुन्हा कोयता गॅंगनी डोकं वर काढला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केलं असलं तरी कोयता गॅंग पुन्हा निवडणुकीचा तोंडावर सक्रिय झाल्यात. कॅम्पमधील वाईन शॉपवर तिघा तरुणांनी कोयता, लोखंडी रॉडने हल्ला करुन तोडफोड केली. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिलेले आहेत. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयत्याच्या घटना किंवा सीसीटीव्ही हे सोशल माध्यम किंवा माध्यमांना द्यायचे नाही. त्यामुळे पुणे पोलिसांकडूनही ज्या ठिकाणी घटना घडते त्याच ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला जातोय. ते माध्यमांना दिले जात नाही. पाहुयात यावरील एक स्पेशल रिपोर्ट
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.