Pune Porsche Accident | पुण्यात निबंध स्पर्धा! त्या अपघाताचा निषेध म्हणून उपक्रम

कल्याणीनगर मधील अपघातातील अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. हाच धागा पकडून पुणे शहर युवक काँग्रेसने अपघातस्थळीच भव्य राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.

Pune Porsche Accident | कल्याणीनगर मधील अपघातातील अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. हाच धागा पकडून पुणे शहर युवक काँग्रेसने अपघातस्थळीच भव्य राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वय मर्यादा १७ वर्षे ८ महिने ते ५८ वर्षे इतकी असून, विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. माझी आवडती कार (पोर्शे, फरारी, मर्सडिज, की इतर), माझा बाप बिल्डर असता तर ?, दारूचे दुष्परिणाम, नियमपाळा-अपघात टाळा. अर्थात कायदा सर्वांना सारखा आहे, आजची तरूण पिढी अन् व्यवसनाधिनता, रस्ते अपघात टाळण्यासाठी काय करावे ?, मी पोलिस अधिकारी झालो तर..?, भारतात खरंच कायद्यापुढे समानता राहिली आहे का ?, अश्विनी कोष्टा व अनिश अवधिया यांचे खरे मारेकरी कोण ?, माझ्या स्वप्नातील पुणे शहर /असं असावं माझं पुणे शहर हे विषय निबंध स्पर्धेसाठी देण्यात आले आहे. आज (दि.२६) अपघातस्थळी म्हणजे बॉलर पबसमोर कल्याणीनगर येथे ही निबंध स्पर्धा होणार आहे. आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com