काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर सध्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसच सतत तापामुळे त्यांना अॅंटीबायोटिक औषधांचा डोस देखील दिला जात आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची डेंग्यु आणि मलेरियाची चाचणी देखील करण्यात आली होती. या चाचणीचे अहवाल नेगेटिव्ह आलेले आहेत. मात्र अशक्तपणा आणि ताप यामुळे त्यांना दोन दिवसांपासून आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच अशक्तपणा आल्याने त्यांना सलाईन सुद्धा लावण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची तब्बेत बरी नव्हती. त्यांच्या तब्बेतीच्या तपासणीसाठी अनेक डॉक्टर येत होते. त्यानंतर देखील त्यांच्या तब्बेतीत सुधारणा न झाल्याने आता त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. अशक्तपणा आणि ताप असल्याने त्यांना सलाईन देखील लावण्यात आलं आहे. तर डेंग्यु आणि मलेरियाची सध्या साथ सुरू असल्याने त्याची देखील तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल नेगेटिव्ह आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मतर त्यांच्या पांढऱ्या पेशींची संख्या सातत्याने वरखाली होत आहेत. त्यामुळे आजारपणाचं नेमकं कारण शोधण्याचा डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहे. सध्या शिंदे यांना अॅंटीबायोटिक औषधांचा डोस दिला जात असून दोन दिवस विश्रांती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.