Vanchit Bahujan Aghadi News: 'या' 4 जागांवर वंचितचा मविआला फटका!

वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला फटका बसला आहे. चार ठिकाणी वंचित फॅक्टरमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत किमान ११ जागांवर वंचितमुळे काँग्रेसचे गणित बिघडले होते. आता वंचितमुळे चार जागांवर महाविकास आघाडीला फटका बसला आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मध्ये लोकसभा मतदारसंघात वंचितला परमेश्वर रणशुर यांना १० हजार ५२ मतं मिळाली. तर ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाला. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे यांचा ४ हजार ६२६ मतांनी विजय झाला. तर इथे तिसऱ्या क्रमांकावरील प्रकाश आंबेडकरांना २,७६,७४८ मतं पडली. हातकणंगलेत ठाकरे गटाचे सत्यजीत आबा पाटील यांचा १३,४२६ मतांनी पराभव जिथे वंचितच्या डी सी पाटिल यांना ३२,६९६ मतं पडली. बुलढाण्यात ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचा २९,४७९ मतांनी पराभव जिथे वंचितच्या वसंतराव मगर यांना ९८,४४१ मतं मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com