VIDEO: विराटच्या निवृत्तीनंतर पत्नी Anushka Sharma च्या ट्विटची चर्चा

Anushka Sharma Tweet News: अभिनेत्री अनुष्का शर्माची आपल्या पतीसाठी खास ट्विट, या पोस्टची सध्या सगळीकडे विशेष चर्चा.

शनिवारी T20 WCच्या फायनलमध्ये भारताचा दनदनीत विजय झाला आहे. त्यानंतर Virat Kohli याने T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पतीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर पत्नी Anushka Sharma हीने केलेल्या ट्विटची चर्चा सर्वत्र सुरु आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विराट कोहली भारतीय संघासाठी क्रिकेट खेळतोय. टीम इंडियाला T-20 विश्चचषक स्पर्धेत ट्रॉफी मिवळून द्यायची हे स्वप्न उराशी बाळगून तो अविरतपणे मैदानावर झुंज देत होता. आता मात्र त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी मात करून टी-20 विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी भारतात आणली आहे. विशेष म्हणजे त्याने या अंतिम सामन्यात दिमाखदार कामगिरी करत भारतीयांचं मन जिंकलं आणि सामना संपल्यावर अखेर निवृत्ती घेतली. असं ट्विट Anushka Sharma हीने केलं आहे. विराट माझा पती असल्याचा मला अभिमान आहे असं देखील अनुष्का शर्मा हीने ट्विट मध्ये म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com