Video: पुण्यात धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव

राज्यभरातील गोपाळ पथके जी दहीहंडी फोडण्याची वाट बघत असतात. तसेच ढोल पथकाची आणि उत्कृष्ट डॉल्बी साऊंड सिस्टीम असलेली धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी' येथे फोडण्यात येणार आहे.

पुण्यातील हांडेवाडी परिसरामध्ये प्रमोद नाना भानगिरे आयोजित धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव आज होत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची ठाण्याची दहीहंडीची प्रथा पुण्यात सुरू केली आहे. हीच दहीहंडी पुण्यातील महत्त्वाचे आकर्षण झाली आहे. राज्यभरातील गोपाळ पथके जी दहीहंडी फोडण्याची वाट बघत असतात. तसेच ढोल पथकाची आणि उत्कृष्ट डॉल्बी साऊंड सिस्टीम असलेली धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी' येथे फोडण्यात येणार आहे. मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात येत आहे. सुरुवातीला दहीहंडीला सलामी महिलांचं पथक देणार आहे. त्यानंतर वरळी येथील पथक दहीहंडी फोडणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com