Video: शरद पवार पक्षाच्या निशाण्यावर फडणवीस?

अजित पवार यांना सहानुभूती कुणी दाखवणार नाही असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्यात.

Supriya Sule: शरद पवार गटाच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे से बैर नही- देवेंद्र तेरी खैर नहीं, सुप्रिया सुळेंनी प्रवक्त्यांच्या बैठकीत असं वक्तव्य केलंय. बैठकीत सुप्रिया सुळे म्हणाल्या आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील. मुख्यमंत्री यांच्यावर टीका करायची नाही. सरकारवर टीका करताना फक्त देवेंद्र यांच्यावर टीका करायची. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका कोणी ही करणार नाही. आपण आरक्षणाच्या बाजूने आहोत. अजित पवार यांना सहानुभूती कुणी दाखवणार नाही असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्यात. प्रवक्त्यांच्या बैठकीत या अशा वक्तव्यामुळे शरद पवार गटाच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की काय असा प्रश्न पडतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com