Devendra Fadnavis Pune News : आम्ही घर फोडत नाही, पक्ष फोडत नाही; देवेंद्र फडणवीसांकडून विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Pune News update : 'आम्ही कोणाचं घर फोडत नाही, तसेच पक्षही फोडत नाही. पण संधी आली तर सोडतही नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस हे पुण्यात बोलत होते.

पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात विरोधकांच्या पक्ष फोडीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही घर फोडत नाही, पक्षही फोडत नाही. पण संधी आली तर सोडतही नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस हे पुण्यात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस आज शनिवारी पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शरद मोहोळ यांच्या प्रचारसभांसाठी देवेंद्र फडणवीस पुण्यात तळ ठोकून आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं. 'आम्ही घर फोडत नाही, पक्ष फोडत नाही. पण संधी मिळाली तर सोडत नाही. सोबत जर येत असेल, तर त्यांना का टाळायचं? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com