Devendra Fadanvis Raigad Speech | सरकारने केलेल्या योजना सांगत फडणवीसांचं जंगी भाषण!

"मुद्रा लोन, 31 कोटी महिला मोदींमुळे उभ्या राहिल्या. बचत गटांना 8 लाख कोटी रुपये दिले. विधान सभा आणि लोकसभेतही महिलांना आरक्षण देणार आहेत. विश्वकर्मामुळे 12 बलुतेदारांना रोजगार मिळाला", सरकारने केलेल्या योजना सांगत फडणवीसांचं जंगी भाषण!

Devendra Fadanvis Raigad Speech | "पेण ही गणरायाची भूमी आहे गणरायाला आणि छत्रपती याना वंदन करतो. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. दोन पर्याय आहेत एक नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील महायुती आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 26 पक्षांची खिचडी आहे. मोदी यांचे मजबूत इंजिन आहे. 10 वर्षात देशातील 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेखालून वर आले. 60 कोटी लोकांना घरी पिण्याचे पाणी पोहचवले" असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्याचबरोबर फडणवीसांनी सरकारने सुरू केलेल्या काही योजनांबद्दलही सांगितलंय. मुद्रा लोन, 31 कोटी महिला मोदींमुळे उभ्या राहिल्या. बचत गटांना 8 लाख कोटी रुपये दिले. विधान सभा आणि लोकसभेतही महिलांना आरक्षण देणार आहेत. विश्वकर्मामुळे 12 बलुतेदारांना रोजगार मिळाला. आता तर मोदींनी सूर्यघर योजना आणली आहे. Roof top solar योजना हे लावतील त्यांना 300 युनिट वीज मोफत दिली जाईल. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी सुरू केला. पीक विमा, शेतमालावर आधारित उद्योग, मासेमारी करणाऱ्यांसाठी वेगळे मंत्रालय सुरू केलं. नील क्रांती योजना आणली...आणखी काय म्हणाले फडणवीस बघा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com