Fadanvis On Reservation : आरक्षणाबद्दल काय म्हणाले फडणवीस?

Maharashtra Politics : 'काँग्रेसचे लोकं खोटं नरेटीव्ह पसरवतात हे आता राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून सिद्ध झालं आहे. काँग्रेसने कधीही संविधानाची किंमत केली नाही', असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हंटले आहेत.

'भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट असून आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहे.' असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बुधवारी मध्यमांशी बोलताना त्यांनी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेतल्या राहुल गांधी यांच्या भाषणावर देखील त्यांनी यावेळी टीका केली.

'काँग्रेसचे लोकं खोटं नरेटीव्ह पसरवतात हे आता राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून सिद्ध झालं आहे. परदेशात जाऊन त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांचा कहर चेहरा आज देशासमोर आला आहे. राहुल गांधी देशात संविधान वाचवण्यावर भाषण देतात आणि परदेशात जाऊन आरक्षण बंद करण्याच्या गोष्टी करतात, त्यांच सगळं बोलण खोट आहे हेच यातून दिसतं. काँग्रेसने कधीही संविधानाची किंमत केली नाही. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील लोकसभेत जाण्यापासून दूर ठेवले होते. भाजप कधीही आरक्षणाच्या विरोधात नव्हतो. हे आरक्षण आम्ही बंद केल जाऊ देणार नाही.' असंही फडणवीस यांनी म्हंटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com