Video: महाराष्ट्र बंदवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य

यावर देवेंद्र फडणवीसांनी देखील मोठं वक्तव्य केलंय. न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदरच केला पाहिजे.

Devendra Fadnavis: मविआच्या उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना बंदची अंमलबजाणी करण्याचा कोणालाही नाही असा याचिकाकर्त्यांनी कोर्टात युक्तीवाद केलाय. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश आहेत. यावर देवेंद्र फडणवीसांनी देखील मोठं वक्तव्य केलंय. न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदरच केला पाहिजे. या आधी देखील न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे निर्देश दिले होते की राजकीय पक्षांना अशा प्रकारचा बंद करता येणार नाही. ज्यांनी बंद पुकारला होता, आज न्यायालयाने अतिशय स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांनी जर तो बंद परत घेतला असेल तरी ही योग्य भूमिका असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com