पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणामधील पगार न मिळाल्याच्या कारणावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयने आपल्या पगारासाठी अनोख्या पध्दतीने अंदोलन करत थेट रस्त्यावर एलपीजी सिलेंडर उघडून त्यातून गॅस गळती सुरू केली आणि घोषणाबाजी केली. जवळपास १०० सिलेंडर या ठिकाणी लीक करण्यात आले आहेत.
हा प्रकार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी भीतीने आजूबाजूचा परिसर रिकामा केला. सिलेंडरमधून गॅस गळत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित युवकाला ताब्यात घेतल आहे. सुदैवाने वेळेत हस्तक्षेप झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
या डिलिव्हरी बॉयचा आरोप आहे की, तो गेल्या अनेक महिन्यांपासून मेहनत करीत असतानाही त्याला पगार मिळालेला नाही. सतत तक्रारी करूनही कोणी ऐकून घेतलं नाही, त्यामुळे हा टोकाचा पाऊल उचलावं लागलं, असं त्याचं म्हणणं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.