Ajit Pawar : अजित पवारांची दिल्ली वारी; अमित शाह यांची घेतली भेट, काय आहे कारण? पाहा Video

DCM Ajit Pawar Meets Union Home Minister Amit Shah : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत दाखल झालेले आहेत. ते सध्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित पवार काही महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे. आजच रात्री अजित पवार हे मुंबईत परतणार आहे. दिल्ली दाखल झाल्यावर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे.

पक्षाच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत आले असल्याची माहिती आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यामुळेच अजित पवार दिल्लीत गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीत दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. सध्या ते प्रफुल्ल पटेल यांच्या निवास स्थानी असले तरी या दिल्ली वारीत ते कॉनॉनची भेट घेता हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com