Jalna Crime: सूनेने सासूला संपवलं! मृतदेह गोणीत भरला पण...; परभणीतून अटक

Daughter-in-Law Kills Mother-in-Law: जालन्यामध्ये सूनेने सासूची निर्घृण हत्या केली. घरगुती वादातून ही घटना घडली. सासूच्या हत्येनंतर फरार झालेल्या सूनेला पोलिसांनी परभणीतून अटक केली.

जालन्यामध्ये एका महिलेने आपल्या सासूची हत्या केली. हत्येनंतर सासूचा मृतदेह गोणीमध्ये भरून सून फरार झाली. जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये पहाटे ही घटना घडली. सुनेने सासूचं डोकं भिंतीवर आपटून तिची हत्या केली. या महिलेला परभणीतून अटक करण्यात आली.

जालन्यामध्ये सविता शिनगारे (४५ वर्षे) या महिलेची सूनेने हत्या केली. सविता शिनगारे या जालन्यातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये सून प्रतीक्षा शिनगारेसोबत राहत होत्या. त्या मूळच्या बीडच्या असून जालन्यामध्ये भाड्याने घर घेऊन त्या राहत होत्या. सविता यांचा मुलगा लातूरमध्ये नोकरीनिमित्त राहतो. सविता आणि त्यांच्या सूनेमध्ये घरगुती कारणांवरून वाद व्हायचा. या रागातूनच प्रतीक्षाने सासूची हत्या केली.

प्रतीक्षाने पहाटे सासूच्या खोलीमध्ये जाऊन त्यांचे डोकं भिंतीवर आपटून हत्या केली. हत्येनंतर तिने सासूचा मृतदेह गोणीत भरला. विल्हेवाट लावण्यासाठी ती मृतदेह घेऊन जात होती. पण तिला घरमालकाने पाहिले. त्यामुळे ती सासूचा मृतदेह तिथेच टाकून पळू गेली. प्रतीक्षेच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथकं तयार केली होती. अखेर पोलिसांनी काही तासांमध्ये प्रतीक्षाला परभणीतून अटक केली. या घटनेमुळे जालन्यात खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com