Video: "मी तुमच्यासाठी काय केलं असेल तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा", भरणेंचं भावनिक आवाहन

आमदार भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील भादलवाडी तलावाचं आज जनपूजन पार पडलंय.

Datta Bharane: अद्याप महायुतीचं जागावाटप झालं नाही आणि इंदापूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण झालाय.अशात इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपण पुन्हा एकदा इंदापूरचे विधानसभा लढवणार असल्याचे संकेत दिलेत. आमदार भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील भादलवाडी तलावाचं आज जनपूजन पार पडलंय. यावेळी संबोधन करताना भरणे यांनी तुम्हीच सगळे मामा आहेत म्हणून पावणा रावळा जेवढं काही करता येईल तेवढा प्रयत्न करा असं आवाहन केलंय. आपण कधीही जवळचा लांबचा गट तट पाहिले नाही प्रत्येकाला मदत केली आहे. आता काहीजण येथील त्यांना जीव घाला वरून ताक प्यायला म्हणजे ढेकर देऊन जातील. निवडणुकीपुरता मामा नाही मी निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्या सोबत आहे. निवडणुकीपुरता यायचा आणि गोड बोलायचं आणि पावणे पाच वर्ष गायब व्हायचं असा मी नाही. असं मनात भरणे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com