Top 10 Headlines : भाजपनंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलला, मुंबईत धावणार बाईक टॅक्सी, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता.. वाचा १२ वाजताच्या टॉप १० हेडलाइन्स

12 PM Top 10 Headlines : सातपुड्यातल्या मंदिरात दरोडा टाकण्यात आला आहे. तर अनधिकृत भोंग्याबाबतच्या कारवाईचा तपशील देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहे. मुंबईच्या प्रवाशांवर भाडेवाढीची तलवार आहे. इतर १० महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

- भाजपनंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलला २४ अकबर रोडवरून आता ९ ए कोटला रोडवर काँग्रेसचं नवं मुख्यालय असणार आहे.

- समर्थांनी स्थापन केलेल्या सातपुड्यातल्या वारी हनुमान मंदिरात दरोडा. पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील दागिने लुटले.

- मुंबईच्या प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, टॅक्सी ४ तर रिक्षा ३ रुपये प्रति किमीनं वाढण्याची चिन्हं आहेत.

- मुंबईत आता धावणार बाईक टॅक्सी, एका किमीसाठी मोजावे लागणार 3 रुपये. चालकासोबत प्रवाशालाही हेल्मेट अनिवार्य असणार आहे.

- खासगी वाहतूक कंपन्यांसाठी एकच नियमावली, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे सूतोवाच.

- बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये दहा हजार कोटींची घट, विविध प्रकल्पांसाठी ठेवीतील पैशांचा वापर.

- पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, खेडकरवर दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप.

- अनधिकृत भोंग्याबाबतच्या कारवाईचा तपशील द्या, हायकोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे पोलिस महासंचालकांना निर्देश.

- बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नसबंदीचा निर्णय, राज्य सरकार केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव.

- उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता. शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com