Atul Londhe News: अतुल लोंढेंवर शाहांचा खोटा व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी गुन्हा

Atul Londe Booked in Mumbai Police : भाजप नेते अमित शाहांचा खोटा व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आताची सर्वात मोठी बातमी आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ चॅनलवर दाखवल्याप्रकरणात लोंढे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरक्षणाबद्दल अमित शाह यांचा खोटा व्हिडिओ चॅनलवर दाखवणे अतुल लोंढे यांना भोवल्याचे सांगितले जाते. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजप कार्यकर्ता रुपेश मालुसरे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com