Murlidhar Mohol News | मोहोळ यांनी धार्मिक प्रलोभन दाखवलं, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आचारसंहितेंचा भंग केला असा आरोप काँग्रेसना केला आहे. मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

पुणे :

पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आचारसंहितेंचा भंग केला असा आरोप काँग्रेसना केला आहे. मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. मुरलीधळ मोहोळ यांनी वृत्तपत्रातून राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करुया, अशा मथळ्याखाली जाहिरात छापली होती. या जाहिरातीत मोदी राम मूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रकं मोहोळ यांनी वाटली असा आरोप कांग्रेसने केला. राम मंदिराला निवडणुकीता मुद्दा बनवून, धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे आणि याविरोधान निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com