Commercial Gas : गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट, पाहा तुमच्या शहरातल्या किंमती | Video

Gas Cylinder Price Drop : गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेली असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि दिल्लीत या किंमती कमी झाल्या आहेत.

गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आलेली असल्याने व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत ७ रुपयांनी कमी झाली आहे. तर मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ६ रुपये ५० पैशांची कपात करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती कमी झालेल्या आहे. त्यामुळे २ महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २० रुपयांनी स्वस्त झालेले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.

दिल्लीत आता व्यावसायिक गॅस सिलेंडर (१९ किलोचा) १ हजार ७९७ रुपयांना मिळणार आहे. तर कोलकाता शहरात ४ रुपयांची कपात झाली असून, तेथे व्यावसायिक गॅस सिलिंडर १ हजार ९०७ रुपयांना मिळेल. मुंबई आणि चेन्नई या शहरांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६ रुपये ५० पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत १ हजार ७४९.५० रुपये आणि चेन्नईत १ हजार ९५९.५० रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com