Jamkhed News : जमखेडमध्ये पोलिसांनी रोहित पवारांना अडवलं; पोलिस आणि कार्यकर्त्यांत बाचाबाची

Rohit Pawar : जमखेडमध्ये सीआरपीएफ केंद्रावरून राजकारण झालं आहे. रोहित पवार यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली आहे.

जमखेडमध्ये सीआरपीएफ केंद्रावरून राजकारण झालं आहे. आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी लोकार्पण सोहळ्याचं आयोजन केलं होतं. मात्र या सोहळ्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यावेळी रोहित पवार यांना पोलिसांनी सीआरपीएफ केंद्रात जाण्यापासून अडवल्याने पोलिस आणि कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली आहे.

जमखेड येथे सीआरपीएफ केंद्रावरून राजकारण रंगत आहे. गुरुवारी रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या लोकार्पण सोहळ्याला प्रशासनाने परवानगी नाकरल्यानंतर आता रोहित पवार कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पोहोचले आहेत. केंद्रात जाण्याच्या आपल्या निर्णयावर रोहित पवार ठाम आहेत. मात्र पोलिसांकडून त्यांना गेटवरच अडवण्यात आल्यानंतर आता पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली आहे. त्यामुळे परिसरात तणाव दिसून येत आहे. सध्या आमदार रोहित पवार आणि पोलिसांत यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com