VIDEO : जालन्यात कॉंग्रेसच्या बैठकीत राडा; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Jalna News : कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने विधानसभेच्या तोंडावर अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

जालन्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. जिल्ह्यात काँग्रेस आमदारांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान हा गोंधळ झाल्याच सांगण्यात आलं आहे. विद्यमान काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांचे समर्थक एकमेकांना भिडले आहेत.

जालना येथे सोमवारी काँग्रेसच्या विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं , काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन जोरदार घोषणाबाजी झाली निवडणूक निरीक्षक खासदार डॉ.शोभा बच्छाव यांच्या यांच्यासमोरच काँग्रेस समर्थकांचा हा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला

दरम्यान काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ही घटना शुल्लक असल्याच भासवत समर्थकांकडून जिंदाबाद मुर्दाबाद च्या घोषणा झाल्याचे म्हटले याशिवाय कोण अब्दुल हाफिज असा सवाल करत आपला राग देखील व्यक्त केला. तर अब्दुल हाफिज यांनी काँग्रेसच्या आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समर्थकांनी स्टेजवरून ढकलण्याचा प्रयत्न करत विरोधात घोषणाबाजी केल्याचा आरोप केलाय, दरम्यान या प्रकरणी आपण काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले आणि राहुल गांधी यांच्या कडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हंटलय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com