Chhota Rajan gets life imprisonment | कुख्यात गुंड छोटा राजनला जन्मठेप, नेमक्या कोणत्या प्रकरणात कोर्टानं ठोठावली शिक्षा?

Jaya Shetty Case : प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांनी खंडणी न दिल्यानं छोटा राजन टोळीच्या गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयानं कुख्यात गुंड छोटा राजन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. २००१ साली जया शेट्टींवर राजनच्या गुंडांनी गोळीबार केला होता. राजननं शेट्टी यांच्याकडं खंडणीची मागणी केली होती. त्यांनी खंडणी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर शेट्टींवर गोळीबार घडवून आणला होता.

शेट्टी या मुंबईतील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालक होत्या. त्यांना छोटा राजन टोळीकडून खंडणीसाठी वारंवार फोन आणि धमक्या मिळत होत्या. ४ मे २००१ साली त्यांच्याच हॉटेलमध्ये घुसून राजन टोळीच्या दोघा गुंडांनी गोळीबार केला. यात त्यांचा मृत्यू झाला होता. राजन टोळीकडून धमक्या मिळत असल्यानं पोलिसांनी त्यांना सुरक्षाही पुरवली होती. पण हत्येच्या दोन महिन्यांआधी त्यांची सुरक्षा काढण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com