Shiv Sena News: मनसे, दोनशे, घोषणा आणि संभाजीनगरमधला हायवोल्टेज राडा! नेमकं घडलं काय?

Chhatrapati Sambhajinagar: एकमेकांविरोधात घोषणाबाजी करताना दोघांनी एकमेकांवर निशाणा साधला.

छत्रपती संभाजीनगर : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. खैरे आणि भुमरे यांच्यासाठी प्रचाराला रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोघांनाही एकमेकांनी डिवचल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान जोरदार बाचाबाची झाली. एकमेकांविरोधात घोषणाबाजी करताना दोघांनी एकमेकांवर निशाणा साधला. यावेळी अंबादास दानवे यांनी दोनशे रुपयांची नोटही ओवाळली आणि दारुच्या बाटल्यांचा दाखला देत विरोधी प्रचार करणाऱ्यांना डिवचलं. यावरुन आक्रमक झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट आव्हानही दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी वातावरण थंड करण्यासाठी पोलिसांचीही कमलीची दमछाक झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com