Chhagan Bhujbal News : बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर ओबीसींचं आंदोलन|VIDEO

Baramati News Update : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ओबीसी समाजाकडून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं आहे.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर ओबीसीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी समाजाच्यावतीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी महायुतीचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यात अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील पत्ता कट करण्यात आला आहे. यानंतर भुजबळ यांनी याबद्दल उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे यामुळे ओबीसी समाज आणि भुजबळ समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केलं आहे. त्याच अनुषंगाने आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थाना बाहेर जमा होत भुजबळ समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com