VIDEO : धक्कादायक ! प्रेमविवाह केला म्हणून 7 पिढ्या समाजातून केल्या बहिष्कृत !

Beed News : सासऱ्याने जुन्या काळात जातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्याने जातपंचायतीने सासऱ्याला अडीच लाखांचा दंड ठोठावला व जातीतून बहिष्कृत केले आहे.

बीडमधल्या आष्टी तालुक्यातील डोईठाणमध्ये एका व्यक्तीने समाजाची परवानगी न घेता प्रेम विवाह केला म्हणून त्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड भरण्यास असमर्थता दर्शवल्याने या इसमच्या सून आणि मुलासह पुढच्या 7 पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा निर्णय जात पंचायतीने दिला आहे.

सासऱ्याने जुन्या काळात जातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्याने जातपंचायतीने सासऱ्याला अडीच लाखांचा दंड ठोठावला व जातीतून बहिष्कृत केले. हा थकीत दंड आता त्यांचा मुलगा व सुनेने भरावा, असे फर्मान जातपंचायतीने काढले. मात्र, दंड भरण्यास मुलगा व सुनेने असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांना व त्यांच्या पुढच्या सात पिढ्यांना, जातीतून बहिष्कृत करण्याचा निर्णय जातपंचायतीने दिल्याचा धक्कादायक प्रकार डोईठाण (ता. आष्टी) येथे घडला. याप्रकरणी ८ जणांविरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, तक्रारदाराच्या सासऱ्यांनी कधी प्रेमविवाह केला होता त्याची कोणतीही माहिती तक्रारदारांनी दिलेली नाही, अशी माहिती तपास अधिकारी शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com