अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा आता आणखी एका वेगळ्या कनेक्शनने तपास केला जात आहे. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानसोबत सैफ अली खान याच्यावर देखील आरोप झाले होते. त्यामुळे बिश्नोई गॅंगच्या रडारवर सैफ अली खान आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्याच्या गॅंगमधल्या कोणी हा हल्ला केला आहे का? याचा तपास आता पोलीस करू शकत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात आता नवीन बिश्नोई गॅंगचं कनेक्शन समोर येत आहे का? असा आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर पोलीस देखील आता काळवीट शिकार प्रकरणात सलमान सोबत सैफवर देखील आरोप झालेले असल्याने त्यावर आता तपास करण्याची शक्यता आहे. हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या काळवीट शिकारीचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता सलमान खान याला वारंवार धमक्या दिल्या जात आहे. या प्रकरणात सैफचं देखील नाव जोडलं गेलं होतं. त्यामुळे त्याच्यावर झालेला हल्ला हा याच गॅंगने केला आहे का? असा तपास आता पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.