BJP Vs Congress: नागपूरमध्ये काँग्रेसविरोधात सत्ताधारी आक्रमक, दिल्लीत इंडिया आघाडीचे भाजपविरोधात आंदोलन;VIDEO

India Aaghadi VS Mahayuti Andolan: बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान अमित शहा यांनी केला असा आरोप विरोध पक्षनेत्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीसह राज्यात आंदोलने सुरु आहेत.

संसदेत दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अपमान केला असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर कालपासून देशात विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन सुरु आहे.

दिल्लीत विरोध पक्षांनी आंदोलन केले आहे. तर नागपुरात विधानभवनात सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. काल राहुल गांधी यांनी दोन खासदरांना ढकलून दिले असल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले होते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. विरोधक आणि सत्ताधारी नेते आमने-सामने आले आहेत. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधीविरोधात घोषणा दिल्या आहेत.

दिल्लीत घडलेल्या घटनेमुळे राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.दिल्लीतील घटनांचे पडसाद मुंबईतदेखील पाहायला मिळाले. भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेसचे कार्यालय फोडले होते. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागला होता. याचेच पडसाद आज दिल्लीतदेखील पाहायला मिळत आहे. मुंबईत काल वर्षा गायकवाड यांच्या कार्यालय फोडण्यात आले होते. मी दलित आहे, म्हणून माझे कार्यालय फोडले, असा गंभीर आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com