BJP-Congress Clashes: मुंबईत भाजप-कॉंग्रेसमध्ये राडा; बाचाबाची, तोडफोडीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज | VIDEO

Mumbai Congress Party Office : मुंबईत आज भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात चांगलाच राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.

मुंबई कॉंग्रेस कार्यालयाबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे. एकीकडे संसदेत अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर चांगलाच गदारोळ झाला आहे. तर दुसरीकडे आता मुंबईत भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर जोरदार राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे.

संसदेत आज अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ झाला. त्याचे पडसाद आता राज्यात देखील उमटत आहेत. आज सायंकाळी मुंबईतल्या कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते शिरले. मुंबईतील काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात हे कार्यकर्ते शिरले. यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनंतर दोन्ही गटात चांगलाच राडा झालेला दिसला. यावेळई एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याविरोधात वेळीच पाऊले उचलत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यामुळे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून काढता पाय घेतला. पोलिसांनी या प्रकरणी काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com