Shiv Sena News: मताधिक्य घटलं, Mumbai मध्ये BJP- Eknath Shinde यांचे आमदार धोक्यात?

Shiv Sena News Today: मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे गटाचं मताधिक्य घटलं आहे. त्यामुळे त्याचा फटका भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कमी झालेल्या मताधिक्यामुळे मुंबईत भाजप आणि शिंदे गटाचे आठ आमदार धोक्यात असल्याची माहिती मिळतेय. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या दोन उमेदवारांचं मताधिक्य घटलेलं आहे. मुंबईमध्ये विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यापैकी ३ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून महायुतीच्या उमेदवाराला कमी मताधिक्य मिळालंय. तर दोन विधानसभा मतदारसंघांमधून अगदीच काठावर मताधिक्य मिळालेलं आहे. त्यामुळे भाजपच्या एकूण १६ पैकी ५ आमदारांच्या भूमिकेवर लोकसभेच्या निकालानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com