Bird Flu: विदर्भात बर्ड फ्लूने एन्ट्री, ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू

Washim Bird Flu Update: वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममधील ८ हजार कोंबड्यांपैकी ६ हजार ८३१ कोंबड्यांचा २० ते २७ फॅब्रुवारीदरम्यान मृत्यू झाला.

विदर्भात बर्ड फ्लूने एन्ट्री केली आहे. वाशिममध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली आहे. कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापुरे) येथे बर्ड फ्लूने एका पोल्ट्री फार्ममधील तब्ब्ल ८ हजार कोंबड्यांपैकी ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू झाला. कोंबड्यांचा मृत्यू २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान झाला. प्रयोगशाळेच्या तपासणीत कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममधील ८ हजार कोंबड्यांपैकी ६ हजार ८३१ कोंबड्यांचा २० ते २७ फॅब्रुवारीदरम्यान मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अकोला येथील प्रयोगशाळेकडून येथील मृत पक्ष्यांचे नमुने संकलित करून ते तपासणीसाठी पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद-राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानकडे पाठविले. तेथून हे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.

या प्रयोगशाळेच्या तपासणीत कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संसर्ग माणसाला होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या आदेशानुसार अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या नियुक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com