Maratha Arakshan : सुप्रीम कोर्टाकडून अंतिम निर्णय येणार ? मराठा आरक्षणाबाबत आली मोठी अपडेट

Maratha Arakshan Update : मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरु आहे. राज्य सरकारला याआधी या प्रकरणात अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. तरीही राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. ही याचिका आता सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर येत्या ११ सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विनोद पाटील यांच्याच वतीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com