Bhavesh Bhinde Arrest : दया नायक यांच्या टीमने भावेश भिंडेला केली अटक, मुंबईत दाखल

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला होता. या होर्डिंगचा मालक भावेश भिंडेला पोलिसांनी जयपूरहून अटक केली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या टीमने भावेश भिंडेला अटक केली आहे. दुर्घटना घडल्यानंतर भावेश भिंडे फरार होता.

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला होता. या होर्डिंगचा मालक भावेश भिंडेला पोलिसांनी जयपूरहून अटक केली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या टीमने भावेश भिंडेला अटक केली आहे. दुर्घटना घडल्यानंतर भावेश भिंडे फरार होता. भावेशने आपला मोबाईल स्विच ऑफ केला होता. जयपूरमध्ये आपल्या नातेवाईकाचे आधार कार्ड वापरून त्याने रूम बूक केली होती. अखेर मुंबई पोलिसांनी भावेशला अटक केली आहे. भावेशवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस भावेशला विक्रोळी कोर्टात हजर करतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com