Jayant Patil News | जयंत पाटलांचे आधी बॅनर फाडले, नंतर माफी मागण्याचा इशारा दिला! छ.संभाजीनगरात नेमकं काय घडलं?

Jayant Patil News | बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांच्या पाटीवर जयंत पाटलांचे बॅनर लावल्यामुळे बंजारा ब्रिगेड आक्रमक! थेट बॅनर फाडले

छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे बॅनर फाडण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टसमोरील सिग्नलवर हे बॅनर लावण्यात आले होते. बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांच्या पाटीवर जयंत पाटील यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे बंजारा बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांचं बॅनर फाडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर जयंत पाटील यांनी बंजारा समाजाची माफी मागावी, अन्यथा जयंत पाटील यांच्याविरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बंजारा बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com